Mumbai, जानेवारी 31 -- Stock Market News : नुतनीकृत ऊर्जा क्षेत्रातील वेगानं वाढणारी कंपनी वारी एनर्जीचा शेअर आज ९ टक्क्यांपेक्षा जास्त वधारला आहे. कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल या तेजीला कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे.

गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीनं तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीच्या महसुलात व नफ्यात मोठी वाढ झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम शेअरच्या किंमतीवर झाला आहे. कंपनीचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. वारी एनर्जीचा शेअर आज एनएसईवर २४३५ रुपयांवर उघडला. आज या शेअरमध्ये ९ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे.

वारी एनर्जीनं डिसेंबर तिमाहीत ५०७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्यात वार्षिक आधारावर २६० टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या ऑपरेटिंग रेव्हेन्यूमध्ये ११७ टक्क्य...