Mumbai, फेब्रुवारी 10 -- Share Market News : केआरएन हीट एक्स्चेंजर या छोट्या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. शेअर बाजारात निराशाजनक वातावरण असतानाही गेल्या चार महिन्यांत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत १०० टक्के वाढ झाली आहे. या कालावाधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीचा आयपीओ आला होता. बाजारातून ३४२ कोटी रुपये उभारण्याचं कंपनीचं उद्दिष्ट होतं. हा आयपीओ २१३ पट ओव्हरसब्सक्राइब झाला होता. आयपीओमध्ये शेअरची किंमत २००-२१० रुपये होती. हा शेअर ११८ टक्क्यांनी वधारून ४८० रुपयांवर सूचीबद्ध झाला. आज या शेअरची किंमत आयपीओ किमतीच्या जवळपास ४०० टक्के आहे. केआरएननं २०२९ पर्यंत आपला महसूल सहा पटीनं वाढविण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

केआरन हीटच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत १०१२ रुपये आण...