Mumbai, फेब्रुवारी 4 -- Sharad Pawar on Cancer : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे गेल्या १९९९ पासून मुखाच्या कॅन्सरनेग्रस्त आहेत. या दरम्यान, त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. असह्य आजार असूनही शरद पवार कधी खचले नाही. त्यांनी नेटाने या आजाराला लढा दिला आणि हरवलं सुद्धा. त्यांच्या कॅन्सर लढ्याचे अनेक किस्से सुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच ते अनेक कर्करोगांनी बाधितांसाठी आदर्श देखील आहेत. आज जागतिक कर्करोग दिवस असून या दिवशी त्यांनी ट्विट करत त्यांना झालेल्या वेदना, व्यथा मांडल्या आहेत. या सोबतच त्यांनी या रोगाविरोधात लढण्याचा निर्धार देखील व्यक्त केला आहे.

गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ कर्करोगांशी लढा देणाऱ्या शरद पवार यांनी आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, कर्करोगाशी लढा देणाऱ्या र...