Mumbai, डिसेंबर 8 -- Sharad Pawar on Gujarat Election results: गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा तिथं सत्तेवर येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपला या निवडणुकीत आजवरचं सर्वात मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं भाजपच्या गोटात कमालीचं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना सूचक भाष्य केलं आहे.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झाली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पवार यांनी ताज्या निवडणूक निकालांवर भाष्य केलं. 'गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल कुणाच्या मनात शंका नव्हती. देशाची संपूर्ण सत्ता तिथं वापरली गेली. एकाच राज्याला सोयीच...