Mumbai, फेब्रुवारी 4 -- Tata Motors News : प्रख्यात उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांच्या सोबत सावलीसारखे वावरणारे त्यांचे तरुण मित्र शंतनू नायडू यांना टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. टाटा मोटर्समध्ये महाव्यवस्थापक आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शंतनू नायडू (Shantanu Naidu) यांनी स्वत: लिंक्डइनवर याबाबत माहिती दिली आहे. नव्या नियुक्तीबद्दल शंतनू यांनी आनंद व्यक्त केला आहे. 'टाटा मोटर्समध्ये स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह्सचे जनरल मॅनेजर म्हणून माझा प्रवास सुरू करताना मला आनंद होत आहे. एक काळ होता जेव्हा माझे वडील टाटा मोटर्सच्या प्लाण्टमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही पँट घालून घरी जात असत. मी खिडकीत बसून त्यांची वाट पाहत असे. त्या दिवसांची आठवण मला आज होतेय. माझ्या नव्या नियुक्तीमुळं एक वर्तुळ प...