Mumbai, फेब्रुवारी 7 -- Shani Amavasya Upay In Marathi : शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनि ग्रह दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलत असतो. शनि ग्रह सध्या कुंभ राशीत आहे, पण काही दिवसातच शनि ग्रह राशी बदलणार आहे. ज्या दिवशी शनि ग्रह आपली राशी बदलेल त्याच दिवशी शनि अमावस्याही असेल. यासोबतच याच दिवशी सूर्यग्रहणही होणार आहे. शनि अमावस्या हा शनिपूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. असा योगायोग क्वचितच पाहायला मिळतो. राशिचक्र बदल आणि ग्रहण सर्व राशींवर परिणाम करणार आहेत.

शनि अमावस्येच्या दिवशी शनीचे मीन राशीत संक्रमण होत आहे. या दिवशी शनीची साडेसाती आणि ढैयामध्येही बदल होईल. शनीच्या संक्रमणाने काही राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती आणि ढैय्याचा परिणाम सुरू होईल तर काही राशीच्या लोकांना साडेसाती आणि ढैय्याच्या प्रभावातून मुक्ती मिळेल. शनि ग्...