Mumbai, मार्च 13 -- शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत १२ जिल्ह्यांमधून जाणार असून,महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणारा आहे. त्यामुळे मराठवाडा,विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले की,जसे समृद्धी महामार्गामुळे १२ जिल्ह्यांचे जीवनमान बदलले,त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गामुळेही मोठे परिवर्तन घडेल. या महामार्गामुळे राज्यातील विविध भागांत सुलभ आणि वेगवान वाहतूक व्यवस्था निर्माण होईल,ज्यामुळे व्यापार आणि उद्योगांना गती मिळेल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,कोल्हापूर जिल्ह्यातील अन...