Mumbai, फेब्रुवारी 3 -- Share Market : केंद्रीय अर्थसंकल्पानंतरच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी शेअर बाजारात आज घसरण पाहायला मिळाली. तेल आणि नैसर्गिक वायू, मेटल्स आणि किरकोळ विक्री क्षेत्रातील (FMCG) कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१९.२२ अंकांनी घसरून ७७,१८६.७४ अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी १२१.१० अंकांनी घसरून २३३६१.०५ अंकांवर बंद झाला.

केंद्रीय अर्थसंकल्प हा तसा समतोल साधणारा व मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे असं सार्वत्रिक मत आहे. १२.७५ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना शून्य प्राप्तिकर, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) कस्टमाइज्ड क्रेडिट कार्डसह वाढीव क्रेडिट गॅरंटी, इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) ३५ अतिरिक्त भांडवली वस्तूंसाठी सीमा शुल्कात सूट, जागतिक क्षमता क...