Mumbai, फेब्रुवारी 7 -- State Bank Of India Q3 Results : स्टेट बँक ऑफ इंडियाचे तिमाही निकाल नुकतेच जाहीर झाले. बँकेच्या तिमाही नफ्यात तब्बल ८४ टक्के वाढ झाली आहे. असं असतानाही शेअरमध्ये आज मोठी घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात बँकेचा शेअर १.२८ रुपयांनी घसरून ७४२.६० रुपयांवर ट्रेड करत आहे.

तिमाही निकालाच्या आकडेवारीनुसार, एसबीआयच्या निव्वळ नफ्यात ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत ८४ टक्क्यांनी वाढ झाली असून तो १६,८९१ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला ९,१६४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

या तिमाहीत बँकेचा व्याजातून निव्वळ नफा ४ टक्क्यांनी वाढून ४१,४४६ कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ३९,८१६ कोटी रुपये होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचा खर्च १७ टक्क्यांनी घटून १६,०७४ कोटी रुपयांवर आला आहे.

हेह...