भारत, जानेवारी 31 -- 'काहे दिया परदेस' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सायली संजीव (Sayali Sanjeev). तिने काही मोजक्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आज ३१ जानेवारी रोजी सायली संजीवचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी खास गोष्टी...

सायली संजीवला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh khan) आवडतो. एका कार्यक्रमा दरम्यान ती शाहरुखला भेटली. जेव्हा शाहरुखने तिच्याशी बोलायला सुरुवात केली तेव्हा सायली केवळ त्याच्याकडे पाहात बसली होती. या भेटीचा किस्सा स्वत: सायलीने एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.वाचा: पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडचे दरवाजे पुन्हा उघडले! आतिफ अस्लमला पहिली संधी

"मी माझ्या मित्राच्या लग...