Mumbai, जानेवारी 31 -- Sant Tukaram Maharaj Jayanti : संत तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. त्यांचा जन्म देहू येथे माघ शुद्ध पंचमीला, अर्थात वसंत पंचमीला ( सोमवार, दिनांक २१ जानेवारी १६०८) झाला. संत तुकाराम यांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) असे आहे. महाराजांच्या आईचे नाव कनकाई बोल्बोबा अंबिले आहे. तर पत्नीचे नाव आवली असे आहे. महाराजांना महादेव, विठोबा, नारायण आणि भागूबाई अशी अपत्ये होती. केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य) हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. तर महाराजांचे शिष्य संत निळोबा, संत बहिणाबाई आणि संत भगवानबाबा हे होते. त्यांनी रचना केलेले अभंग तुकारामाची गाथा या ग्रंथात समाविष्ट आहे. यात ५ हजारांवर अभंग आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त ...