Mumbai, फेब्रुवारी 12 -- Sant Ravidas Jayanti : या वर्षी संत रविदास यांची ६४८ वी जयंती १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमेला साजरी केली जात आहे. रविदासांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील जातीय भेदभाव दूर करण्यासाठी आणि समाजसुधारणा आणि समाज कल्याण कार्यासाठी समर्पित केले. या दिवशी त्यांचे अनुयायी अनेक धार्मिक विधी, कीर्तन आणि यात्रा करतात.

रविदास यांना रायदास, रोहिदास आणि रुहिदास असेही म्हणतात. रविदास यांनी आपल्या जीवनात सामाजिक समता, बंधुत्व आणि भक्तीचा संदेश दिला. त्यांनी जातिव्यवस्थेचा विरोध करून मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या रचनांमध्ये ईश्वरभक्ती, मानवतावाद आणि सामाजिक न्याय यांचा समावेश आहे. त्यांच्या काही रचना गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत, ज्यामुळे त्यांना शीख धर्मातही महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

महान संत, कवी, तत्त्वज्ञानी...