Mumbai, फेब्रुवारी 13 -- Sant Narhari Sonar: 'देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार', 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई', 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा', 'माझे प्रेम तुझे पायी' हे अभंग अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहेत. या अभंगाचे रचनाकार संत नरहरी सोनार यांची माघ कृष्ण तृतिया, अर्थात शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने संत नरहरी सोनार यांचे हे पुण्यस्मरण

वारकरी संप्रदायातील हरि-हराचा मिटवला वाद

संत नरहरी सोनार यांनी वारकरी संप्रदायातील हरी-हराचा वाद मिटवला. त्यासाठी ते आयुष्यभर झटले. शिवउपासक असणारे संत नरहरी यांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठलमय केले. माघ कृष्ण तृतीयेला संत नरहरी सोनार यांनी समाधी घेतली. परळी वैजनाथ येथे आणि राज्यात अनेक ठिकाणी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

संत नरहरी सोनार यांचा जन्म पंढरपूर येथे १३१...