Mumbai, मे 25 -- Ekadanta Sankashti Chaturthi 2024 : दरवर्षी एकदंत संकष्टी चतुर्थी हा उत्सव ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो. यावेळी एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत रविवारी (२६ मे) केले जाणार आहे. हा दिवस गणपतीला समर्पित आहे. या शुभ मुहूर्तावर श्रीगणेशाची आराधना करून व्रत पाळण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार गणेश देवाची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य वाढते.

Vastu Tips : अंथरुणावर बसून जेवण का करू नये? ज्योतिशास्त्रातील जेवण जेवण्याचे योग्य नियम जाणून घ्या

पंचांगानुसार, यावेळी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी रविवार, २६ मे रोजी संध्याकाळी ६:०६ वाजता सुरू होईल. ही तारीख सोमवार, २७ मे रोजी दुपारी ०४:५३ वाजता संपेल.

चतुर्थी तिथीला चंद्रोदयाचे महत्त्व आहे. चतुर्थी तिथीनंतर पंचमीला २७ मे रोजी चंद्रोदय ह...