Mumbai, फेब्रुवारी 12 -- Sankashti Chaturthi February 2025 : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने साधकाचे सर्व दु:ख आणि क्लेश दूर होतात. त्याचबरोबर सुख-सौभाग्य आणि संतती प्राप्ती होते. पंचांगानुसार यावर्षी १६ फेब्रुवारी २०२५ रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. हा दिवस गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिवत पूजा आणि उपवास केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. जाणून घेऊया गणेशाला प्रसन्न करण्यासाठी संकष्ट चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ.

पंचांगानुसार महिन्यातील शुक्ल पक्षाची चतु...