Mumbai, एप्रिल 15 -- Sanjay Raut on Shrikant Shinde Foundation : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या नावानं असलेल्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशननं ५०० कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. फडणवीस यांनी या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय चौकशी लावण्याची मागणी करावी, असं आव्हानही राऊत यांनी दिलं आहे.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये कागदोपत्री फक्त ४० ते ५० लाखांची उलाढाल आहे. मात्र या फाऊंडेशनच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवण्यात आलेत किंवा खर्च करण्यात आला आहे, ती रक्कम शेकडो कोटींमध्ये आहे. कॅशमध्ये करण्या...