Mumbai, फेब्रुवारी 10 -- Sanjay Raut News: दिल्ली विधानसभेचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरला. तब्बल २७ वर्षानंतर भाजपने दिल्ली काबीज केली. तर, सलग दोन वेळा बहुमताने विजय मिळवलेल्या आम आदमी पक्षाला यावेळी विरोधी पक्षाच्या बाकांवर बसण्याची वेळ आली. दिल्ली विधानसभेच्या निकालावर अनेक राजकीय नेत्यांनी आपली मत मांडली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आप आणि काँग्रेस पक्षाच्या पराभवाचे विश्लेषण केले आहे.

काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने सलोखा दाखवला असता तर आज भाजपचा विजय झाला नसता. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, 'युतीत अहंकार होता कामा नये. दोन्ही पक्षांनी एकत्र बसून चर्चा केली असती आणि थोडी तडजोड केली असती तर दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा ल...