भारत, मार्च 22 -- संजय खोडके या नावाची पहिली ओळख २००५ मध्ये झाली. एका राज्यस्तरीय दैनिकामध्ये काम करत असताना यवतमाळवरून माझी नुकतीच अमरावती येथे बदली झाली होती. अमरावती शहराचे राजकारण समजून घेण्यास नुकतीच सुरुवात केली होती. तेव्हा अमरावतीच्या राजकारणात काँग्रेस नेते व तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांच्यासह संजय खोडके यांच्या नावाचा दबदबा होता.

संजय खोडके तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे ओएसडी होते. जिल्ह्यातील राजकारणासह सर्वच क्षेत्रात ते लक्ष देत होते. पत्नी सुलभाताई खोडके आमदार असल्या तरी सर्वत्र संचार संजुभाऊंचा होता. मात्र वर्तमानपत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख क्वचितच होत होता. फोटो तर चुकूनही कुठेच येत नव्हता. मी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांकडे चौकशी केली, 'संजुभाऊंचा फोटो का नाही?' उत्तर मिळाले-'त्...