Sangli, एप्रिल 15 -- Sangli Superstition News : सांगलीत एक अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली आहे. ही घटना सांगलीतील मिरज तालुक्यात घडली आहे. कवलापूर गावात गेल्या सोमवती अमावस्येच्या दिवशी एकाने अंधश्रद्धेतून एका जिवंत बोकडाला उलटे लकवले होते. या बोकडाचा तब्बल सात दिवसानंतर मृत्यू झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ही घटना कळल्यावर त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. यानंतर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील कवलापूर (ता. मिरज) येथे तासगाव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका लिंबाच्या झाडाला आठवड्याभारापूर्वी सोमवती अमावास्येच्या दिवशी अंधश्रद्धेतून एका जिवंत बोकडाचे दोन्ही पाय दोरीने बांधून त्याला झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले होते. आठ द...