Mumbai, फेब्रुवारी 6 -- Sangli Rape News: सांगली जिल्ह्यातून अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली. चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह पेटीत लपवला. याप्रकरणी पोलिसांनी एका नराधमाला अटक केली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील करजगे गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पांडुरंग सोमनिंग कळळी पुजारीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा चिमुरडीच्या शेजारी राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुरडी गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होती. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. पंरतु, ती कुठेच सापडली नाही. यानंतर गावात दवंडी पिटवून शोध सुरू करण्यात आला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव...