Kolhapur, फेब्रुवारी 7 -- Sambhaji Raje Chhatrapati not reacheble from last five days: कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी येत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासूंन नॉट रीचेबल आहेत. त्यांनी ३ जानेवारीपासून त्यांचे सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रम रद्द केले आहे. दरम्यान, ते नेमके कुठे आहेत याची माहिती कुणालाही नाही. दरम्यान, त्यांच्या या अचानक गायब होण्यामुळे राज्यभरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

संभाजी राजे छत्रपती यांना कोल्हापूर येथील लोकसभा निवडणूक लढवायची आहे. या साठी महावीकास आघाडीतून उमेदवारी संदर्भात त्यांच्या चर्चा सुरू आहे. अद्याप यावर योग्य तोडगा निघालेला नाही. दरम्यान, ३ जानेवारीला त्यांनी ट्विट करत सर्व कार्यक्रम रद्द करणार असल्याचे सांगितले.

संभाजी राजे छापत्रपती यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामा...