Mumbai, एप्रिल 15 -- salman khan firing case update : बॉलीवूडचा स्टार अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील इमारतीवर रविवारी पहाटे दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोर हे दुचाकीवरून आले होते. गोळीबार केल्यानंतर दोघेही हल्लेखोर पळून गेले होते. दोघांनी हेल्मेट घातले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नव्हती. या घटनेत कुणी जखमी अथवा मृत्यूमुखी पडले नसले तरी या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिस अॅक्शनमोड मध्ये आले असून दोन्ही हल्लेखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन्ही हल्लेखोरांचे फोटो पुढे आले असून त्या दृष्टीने पोलिस आता तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांची दुचाकीही ताब्यात घेतली आहे. दोन्ही हल्लेखोरांचे फोटोही समो...