Mumbai, एप्रिल 14 -- Salman Khan News: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील येथील निवासस्थानाबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी रविवारी पहाटे गोळीबार केला. याप्रकरणी मुबंई पोलिसाच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला असता सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे. अनमोल बिश्नोई या नावाने व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली. पोलीस आता या व्हायरल पोस्टचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फेसूबकमध्ये असे म्हटले आहे की, "सलमान खान, तुला आमची ताकद दाखवायची होती. त्यासाठीच हा हल्ला होता. तुझ्यासाठी हा शेवटचा इशारा आहे. यानंतर मोकळ्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत. ज्या दाऊद आणि छोटा शकीलला तू देव मानतोस, त्यांच्या न...