Mumbai, एप्रिल 15 -- Salman Khan House Firing case update : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर रविवारी पहाटे हल्ला झाला होता. या हल्ल्या प्रकरणी अनेक पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. हल्ला कुणी केला हे देखील तपासात निष्पन्न झाले आहे. या सोबतच त्यांनी वापरलेल्या दुचाकीबद्दल देखील माहिती मिळाली आहे. ही दुचाकी सेकंड हँड विकत घेण्यात आली असून ती रायगड येथून घेण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.

सलमान खान याच्यावर हल्ला झाल्यावर मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास अधिक वेगवान केला आहे. हल्लेखोर कोठून आले. कसे आले ? त्यांनी बाईक कोणती वापरली या बाबत मोठी माहिती तपासात पुढे आली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी हल्लेखोरांनी बाईक खरेदी केली होती. ही बाईक त्यांनी रायगड जिल्ह्यातून खरेदी...