Mumbai, एप्रिल 15 -- Raj Thackeray meets with Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या मुंबईतील घरावर रविवारी गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सलमानच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सलमान खान यांची भेट घेण्यासाठी अनेक सेलिब्रेटी आणि नेते मंडळींनी सलमानच्या घरी जाऊन चौकशी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काल सलमानची भेट भेटली. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील सलमान खानची त्याच्या घरी जाऊन भेट घेत चौकशी केली.

रविवारी पहाटे ४.५५ मिनिटांनी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी वांद्रे येथे असणाऱ्या सलमान खान यांच्या घरावर गोळीबार केला. यानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिस घटनास्थळ...