Mumbai, जानेवारी 8 -- Salman Khan Panvel Farm House: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ वेळोवेळी पाहायला मिळत असते. आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक मिळवण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. दोन अज्ञात तरुणांनी सलमान खानच्या पनवेल स्थित फार्म हाऊसमध्ये अवैधरीत्या शिरण्याचा प्रयत्न केला आहे. सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या कुंपणाच्या तारा तोडून दोन तरुणांनी थेट सलमान खानच्या घरात शिरकाव केला होता. मात्र, या दोन्ही तरुणांना तिथल्या सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे.

सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही तरुणांना पकडून पनवेल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी या तरुणांना अटक केली असून, त्यांच्या चौकशीत अनेक खुलासे ...