Mumbai, फेब्रुवारी 10 -- Saif Ali Khan Attack Story : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या ड्रायव्हरपासून ते त्याच्या कुटुंबियांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आता पहिल्यांदाच सैफ अली खानने स्वत: त्या दिवशी घडलेल्या घटनेची कहाणी सांगितली आहे. सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्याने पहिल्यांदा शरीफुल इस्लाम पाहिला तेव्हा काय वाटले होते. दोघांमध्ये वादावादी नेमकी कशी सुरू झाली, हे देखील त्याने सांगितले. त्याच्या हातात चाकू आहे, याचा सैफला अंदाज आला नव्हता. हल्लेखोराला पहिल्यांदा पाहिले तेव्हा सैफला वाटले की, त्याच्या हातात काठी आहे.

सैफ अली खानने टीओआयशी बोलताना सांगितले की, करीना डिनरसाठी बाहेर गेली होती आणि तो घरीच थांबला होता. कररीना प...