भारत, सप्टेंबर 18 -- गेल्या काही दिवसांपासून 'विक्रम वेधा' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहात. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन आणि बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या दोघेही कलाकार या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हृतिकने भर कार्यक्रमात सैफची खिल्ली उडवली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. या पुरस्कार सोहळ्यात सैफ अली खान आणि शाहरुख खान दोघे सूत्रसंचालन करत असतात. सैफ हृतिक रोशनची मजा घेण्यासाठी त्याला प्रश्न विचारतो. पण त्याच्या अगदी विरुद्ध घडते. हृतिक रोशन भर कार्यक्रमात सैफ आणि शाहरुखची फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांवरुन खिल्ली उडवतो.वाचा: शाहरुख खानच्या लेकाच्या प्रेमात ह...