Mumbai, एप्रिल 15 -- शिर्डीचे देवस्थान हे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. साई बाबांचा जन्म १९ व्या शतकाच्या सुरूवातीला झाला होता, असे मानले जाते. साई बाबांनी त्यांचे बहुतेक आयुष्य हे शिर्डीमध्ये घालवले होते.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात साईबाबांचे भव्य-दिव्य मंदिर आहे. शिर्डीमध्ये साईबाबांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना 'शिर्डीचे साईबाबा' असे ओळखले जाते. साईबाबांनी शिर्डीमध्ये ६० वर्षे राहून मानवजातीची सेवा केली होती. येथूनच जगाला मानवता, कल्याण आणि एकात्मतेची अमूल्य शिकवण साईबाबांनी दिली. साईबाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र दिला होता.

Ram Navami Wishes : राम जन्मला ग सखे राम जन्मला...श्रीराम नवमीच्या शुभेच्छा, वाच...