भारत, मार्च 17 -- Sachin Tendulkar Upper Cut Video : इंटरनॅशनल मास्टर्स लीगचा पहिला सीझन इंडिया मास्टर्स संघाने जिंकला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्स संघाने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा ६ विकेट राखून पराभव केला. वेस्ट इंडिज मास्टर्स संघाचे नेतृत्व महान फलंदाज ब्रायन लारा याने केले.

इंडिया मास्टर्सचा कर्णधार सचिन तेंडुलकर याने १८ चेंडूत २५ धावा केल्या. या खेळीत सचिनने एक शानदार अपर कटचा फटका मारला. हा शॉट पाहून चाहत्यांची २२ वर्षांपूर्वीची एक आठवण ताजी झाली.

वास्तविक, सचिन तेंडुलकर याने २००३ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या शोएब अख्तर याला असाच अपर कट लगावला होता. तो चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला होता. आता सचिनने २२ वर्षांनी पुन्हा एकदा अगदी तसाच फटका मारला. यावेळी गोलंदाज वेस्ट इंडिजचा जेरोम टेलर ...