Mumbai, फेब्रुवारी 3 -- Exchange Rate News : केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण सुरू असताना आर्थिक पातळीवर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण सुरू आहे तर, रुपयांचं मूल्य डॉलरच्या तुलनेत कमालीचं घसरलं आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ५४ पैशांच्या मोठ्या घसरणीसह ८७.१६ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. जाणकारांच्या मते, येत्या ६ ते १० महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपया ९० ते ९२ पर्यंत खाली येऊ शकतो. त्यामुळं महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांतून आयात मालावर व्यापारी कर लादल्यानंतर अमेरिकी डॉलरमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आशियाई चलनात घसरण होत असून सोमवारी भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर उघडला. रुपयानं प्रथमच ८७ चा टप्पा ओलांडला. डोनाल्ड ट्रम्प यांन...