Mumbai, मार्च 31 -- RR VS CSK IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या ११ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. रविवारी (३० मार्च) गुवाहटीच्या बारसपारा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.

या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सीएसकेला २० षटकात ६ बाद १७६ धावाच करता आल्या.

तत्पूर्वी, १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग CSK संकटात सापडला होता, अशा वेळी फिनीशर धोनी फलंदाजीला आला. धोनी मैदानात आला, तेव्हा टीमला विजयासाठी २५ चेंडूत ५४ धावा करायच्या होत्या. 'थाला' सहसा असे सामने पूर्ण केल्यानंतरच श्वास घेतो, परंतु राजस्थानविरुद्धच्या सामन्यात तो ११ चेंडूत १६ धावा करून बाद झाला.

संदीप शर्मा याच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायर याने धोनीचा अप्रतिम झेल घेतला. हा सामना गुवाहाटीमध्ये ...