भारत, नोव्हेंबर 24 -- Ronaldo fined: कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मोठी उलथापालथ दिसून आली. बलाढ्य संघांना पराभवाचा धक्का बसला आहे. दरम्यान, आता ख्रिस्तियानो रोनाल्डोला मोठा दणका बसलाय. इंग्लंडच्या एफए कपकडून रोनाल्डोला दंड करण्यात आला असून दोन सामन्यांसाठी बंदीही घालण्यात आली आहे.

रोनाल्डो इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडकडून खेळतो. काही महिन्यापूर्वी एका सामन्यात पराभवानंतर तो चाहत्यावर संतापला होता. तेव्हा त्याने रागाच्या भरात चाहत्याचा मोबाईल फोडला होता. याप्रकरणी आता रोनाल्डोवर कारवाई करताना दंड आणि बंदी घातली आहे.

द मिररने दिलेल्या वृत्तानुसार, रोनाल्डोवर ५० हजार पाउंड म्हणजे भारतीय चलनानुसार ४९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच एफए कपने त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आह...