Mumbai, मार्च 14 -- Rohit Sharma ODI Retirement Update : रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. यानंतर रोहित शर्माने आपण वनडे फॉरमॅटमध्ये खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, सध्या तरी या फॉरमॅटला अलविदा करण्याचा विचार नाही, असे त्याने म्हटले होते.

वास्तविक, यापूर्वी असे मानले जात होते की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा वनडे फॉरमॅटला अलविदा करेल. मात्र, निवृत्तीबाबतच्या सर्व चर्चा त्याने फेटाळून लावल्या.

आता प्रश्न असा आहे की, रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये किती दिवस खेळणार? अशातच, यासंबंधीची मोठी माहिती समोर येत आहे.

रोहित शर्मा सध्या ३८ वर्षांचा आहे. त्याच्या खराब फिटनेसवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण आता भारतीय कर्णधाराने फिटनेस सुधारण्याचा मार्ग शोधला आहे. खरं तर...