भारत, फेब्रुवारी 25 -- भारतात रस्ते अपघातात शेकडो नागरिकांचा मृत्यू होतो आणि हजारो माणसे जखमी होतात. दिवसेंदिवस हे वाढते प्रमाण गंभीर चिंतेचा विषय बनले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात जगातील केवळ १ वाहने आहेत, पण जागतिक स्तरावरील रस्ता अपघातांमधील मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू भारतात होतात. 2022 मध्ये देशात एकूण 4,61,312 रस्ते अपघात झाले. या अपघातांमध्ये 1,68,491 जणांचा मृत्यू झाला आणि 4,43,366 जण जखमी झाले. मागील वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये 11.9%, मृत्यूंमध्ये 9.4% आणि जखमींच्या संख्येत 15.3% वाढ झाली आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे सीईओ श्री राकेश जैन

सरकारने रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मोटर वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 लागू करणे, राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातप्रवण ठिकाणे ओ...