Mumbai, फेब्रुवारी 6 -- The Other World Natak : 'द... अदर वर्ल्ड' हे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक आहे. हे नाटक पंचतत्त्वांशी माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांच्या सोबत आपली नव्याने ओळख करून देते आणि आपल्या पर्यावरण, पृथ्वी आणि मानवतेच्या रक्षणासाठी प्रत्येकाला सज्ज होण्याचे आवाहन करते. या सृजनशील कलाकृती मध्ये सौंदर्याचा बोध पाहायला मिळतो. निसर्ग आपल्या सर्वाना कुशीत घेतो आणि सृष्टीतून माणसाला सभोवताली पाहण्याची दृष्टी देतो. नदी,नाले,ओढे, झरे,समुद्र, पक्ष्याचे विविध आवाज त्यांचा किलबिलाट, वाढत्या शहरीकरणामुळे याच्या सगळ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून या नाटकाच्या विषयानुसार पर्यावरण आणि मानवतेच्या मुद्द्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.

"द... अदर वर्ल्ड" हे मंजु...