Delhi, एप्रिल 15 -- Retired Judges write letter to CJI : भारतीय न्यायव्यवस्था कमकुवत करण्यात प्रयत्न होत आहे. ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणी लक्ष घालण्यात यावे, अशी मागणी माजी न्यायाधीशांनी केली आहे. या प्रकरणी तब्बल २१ निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहिले असून या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन तसेच उपाय योजना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या पत्रात लिहिले आहे की, 'काही गट दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवून आणि लोकांचा अपमान करून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. आम्ही याबद्दल आमची सामान्य चिंता व्यक्त करतो.

२१ निवृत्त न्यायाधीशांनी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये काही लोकांकडून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या निवृत्त न्यायाधीशांनी क...