Mumbai, जानेवारी 24 -- दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन भारतात अभिमानाने आणि उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या घटनेच्या अंमलबजावणीचे आणि सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनण्याचे प्रतीक आहे.१९५० मध्ये या दिवशी भारताची घटना लागू झाली, ज्याने देशाला एक नवीन ओळख व दिशा दिली. हा दिवस केवळ आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा उत्सव नाही तर त्या स्वातंत्र्यसैनिक आणि नेत्यांना लक्षात ठेवण्याचा एक दिवस आहे, ज्यांनी त्यांचे बलिदान दिले आणि देशाला स्वातंत्र्य दिले.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोक त्यांच्या मित्रांना, कुटूंबाला आणि प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवतात आणि या ऐतिहासिक दिवसाची आठवण करतात. हे संदेश केवळ देशभक्तीच्या भावनेवरच लक्ष केंद्रित करत नाहीत तर ऐक्य आणि अखंडतेच्या संदेशास देखील प...