Mumbai, एप्रिल 26 -- Realme C65 price in india: स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीचा नवा स्मार्टफोन रिअलमी सी६५ 5G भारतात लॉन्च झाला आहे. कंपनीने रिअलमी नार्झो ७० आणि नार्झो ७० एक्स लॉन्च केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा स्मार्टफोन बाजारात उतरवला. रियलमी सी ६५ 5G च्या स्टँडआऊट फीचर्समध्ये १२० हर्ट्झ डिस्प्ले, ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरीचा समावेश आहे. फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या नवीन रियलमी सी६५ 5G बद्दल सर्व काही.

रियलमी सी ६५ 5G मध्ये ६.७ इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आणि पीक ब्राइटनेस ६२५ निट्स आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर देण्यात आला आहे, ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते. स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सि...