Mumbai, फेब्रुवारी 2 -- Ratha Saptami 2025 Date In Marathi : सनातन धर्मात रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. पंचांगानुसार यावर्षी रथसप्तमी मंगळवार ४ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेवाचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी झाला होता. त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. असे केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि नोकरी-व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता असते, असे म्हटले जाते. रथसप्तमीच्या दिवशी स्नान, ध्यान आणि सूर्यदेवाची पूजा करून जीवनातील अडथळे दूर करता येतात. चला जाणून घेऊया रथसप्तमीची नेमकी तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व.

पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी सुरू होईल आ...