Mumbai, फेब्रुवारी 14 -- प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia ) कॉमेडियन समय रैनाच्या ''इंडियाज गॉट लॅटेंट' (India's Got Latent) या शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य करून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्याविरोधात देशाच्या विविध भागात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याच्याविरोधात आसाम आणि मुंबईत गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, रणवीर अलाहाबादियाचा जबाब घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचलेल्या मुंबई पोलिसांना त्याच्या घराला कुलूप लावलेले दिसले. पोलिसांनी सांगितले की, रणवीरचा मोबाइल फोन बंद होता आणि त्याच्या वकिलांशी संपर्क होऊ शकला नाही.

Ranveer Allahbadia : मुंबई ते आसाम कायद्याच्या कचाट्यात अडकला रणवीर अलाहाबादिया, अनेक ठिकाणी FIR; कोर्टातही गेले लोक

अलाहाबादमधील वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये...