भारत, फेब्रुवारी 2 -- येत्या ४ फेब्रुवारी रोजी 'जागतिक कर्करोग दिन' साजरा केला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत कँसरबद्दल जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल डी'क्रूझ यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले. भारतात कँसर झपाट्याने वाढत असून प्रतिबंध आणि वेळेत निदान हीच या जीवघेण्या आजाराविरुद्धची सर्वात प्रभावी शस्त्रे असल्याचे डॉ. अनिल डी'क्रूझ यांनी सांगितले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन झाले. लोकांनी आरोग्यासंबंधी जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास काव्यशैलीत सांगितले. आपण मद्यपान करत नसल्याने अनेक आजारांपासून दूर राहिल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

कँसरतज्ज्ञ...