Mumbai, एप्रिल 15 -- चैत्र शुद्ध नवमी हा दिवस आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो. यंदा बुधवार १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येईल. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री १२ वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी १२ वाजता झाला.

भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिरात भाविक आवर्जुन दर्शन घ्यायला जातील. रामनवमी सर्व राम मंदिरात मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो.रामनवमीच्या दिवशी, म्हणजेच १७ एप्रिलला तुम्ही रामाची पूजा सकाळी ११ वाजून १ मिनिटापासून ते दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत करू शकता. राम नवमीनिमित्त आपल्या आप्तस्वकीयांना...