Mumbai, एप्रिल 14 -- दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. त्यानुसार यंदा १७ एप्रिलला रामनवमी आहे. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम प्रकट झाले होते. म्हणून भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो.

भगवान श्रीरामाची उपासना करणारे भक्त कष्टाळू, सदाचारी, क्षमाशील, दयाळू, धार्मिक आणि आदर्शवादी असतात, अशी धार्मिक धारणा आहे.

Ram Navami 2024 : रामनवमीला तयार होतोय हा शुभ योग, जाणून घ्या पूजेची तारीख आणि मुहूर्त

भगवान श्रीरामाच्या कृपेने साधकाच्या जीवनातील सर्व दु:ख, संकटे दूर होतात. जर तुम्हालाही मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर रामनवमीच्या दिवशी तुमच्या देवतेची यथासांग पूजा करा. तसेच पूजा करताना तुमच्या राशीनुसार म...