Mumbai, मे 24 -- राज्यसभेची (Rajya Sabha Election 2022) सहावी जागा लढण्याची घोषणा शिवसेनेनं (Shivsena) केल्यानंतर हा उमेदवार कोण असेल याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. शिवसेनेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या जागेसाठी शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल. त्यामुळं संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) राज्यसभेसाठी शिवसेनेत प्रवेश करणार की नाही, हा प्रश्नही निकालात निघाला आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी पुढील महिन्याच्या सुरुवातीला निवडणूक होत आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार सहज निवडून जाणार आहे. सहाव्या जागेसाठी खरी चुरस आहे. सह...