Mumbai, मे 21 -- राज्यसभेच्या सहा जागांसाठी जून महिन्यात होणाऱ्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) निमित्तानं राज्यात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेनं दोन उमेदवार देण्याची घोषणा केली असून दोन्ही उमेदवार पक्षाचेच असतील, अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळं अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांची गोची झाली आहे. ते आता काय भूमिका घेतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातून निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी भाजपकडून दोन, काँग्रेसकडून एक, राष्ट्रवादीकडून एक आणि शिवसेनेकडून दोन उमेदवार दिले जाणार आहेत. भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकणार आहेत. तर, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून येणार आहे. सहावी जागा लढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवाराला महाविकास आघाडी ...