Mumbai, एप्रिल 8 -- आयपीएल २०२४ मध्ये सोमवारी (८ एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. या सामन्यात ६४ धावांची स्फोटक खेळी करणारा आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्याच्यासोबत विराट कोहलीनेही ६७ धावांची शानदार खेळी केली.

पण, या मोठ्या विजयानंतर कर्णधार पाटीदार याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. बीसीसीआयने त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान आरसीबीने स्लो ओव्हर-रेट राखल्यामुळे आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत, जो स्लो ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, त्याच्या संघाचा हंगामातील हा पहिलाच गुन्हा होता, पाटीदारला १२ लाख रुपया...