Mumbai, फेब्रुवारी 13 -- Rajan Salvi Quits Shiv Sena UBT: राजापूर विधानसभेत माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता कोकणात एकनाथ शिंदेंची ताकद वाढली आहे.

राजन साळवी यांनी बुधवारी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत आणि संघटनेतील अंतर्गत राजकारणात मी माझ्या पदाला न्याय देऊ शकणार नाही. माझ्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा देत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह किनारपट्टीवरील कोकण हा एकेक...