Pune, फेब्रुवारी 2 -- Vishwa Marathi Sahitya Sammelan Pune : पुण्यात तिसरे विश्व मराठी संमेलन आज पार पडले. हे विश्व मराठी संमेलन मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषेसह विविध विषयांवर भाष्य केलं. राज्य सरकारने आणि आम्ही-तुम्ही सर्वांनी आपली मराठी भाषा टिकवली पाहिजे,असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं. 'अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो,पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कारच असतो',असं म्हणत राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली.

राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेता रितेश देशमुख याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी एक अभिनेत्यांना पुरस्कार मात्र आमच्या वाट्याला तिर...