Mumbai, एप्रिल 17 -- Raj Thackeray on Hindi Compulsion : हिंदीला दक्षिण भारतीय राज्यांमध्ये आधीपासूनच विरोध होत आहे. तामिळनाडूतील द्रमुक सरकारने हिंदीविरोधात जोरदार मोहिम उघडली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या करण्याच्या नव्या शैक्षणिक धोरणावर टीका करत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येत आहे, पण आम्ही हे खपवून घेणार नाही असा स्पष्ट शब्दात इशारा हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदाचे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी व इंग्रजीसोबतच हिंदी भाषाही सक्तीची केली जाणार आहे.

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनि...